सातारा : तसं पाहिलं तर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. मात्र, नागरिकांमध्ये लसीबाबत गैरसमज असल्यामुळे लस घेतानाही नागरिक निवड करत आहेत. कोविशिल्ड लस सगळेच घेतायत म्हटल्यावर आपणही हीच लस घेतली पाहिजे, अशी प्रत्येकाची धारणा होऊ लागलीय. परिणामी कोविशिल्ड लसीलाच सर्वांचीच मागणी आहे.
मानवी स्वभाव हा मुळात इतरांचे अनुकरण करणारा आहे. त्यामुळे इथेही हेच दिसून येत आहे. लस घेताना अनेकजण फार चाैकश्या करत आहेत. आपापले फॅमिली डाॅक्टरांना लस कोणती घेऊ हे विचारत आहेत. अनेक डाॅक्टरही या दोन्ही लसींचा फरक करून सांगतायत. त्यामुळे यातील चांगली लस कोविशिल्डच आहे, असा ठाम विश्वास नागरिकांचा बसत आहे. लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर हीच लस आहे का, हे विचारतात.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. दोन्हीमध्येही तेच कंटेन्स आहेत. मात्र, कंपन्या वेगळ्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा गैरसमज होतो. कोव्हॅक्सिनही लस उत्तम आहे. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमात राहू नये. लसीकरण तातडीने करून घ्यावे.
- अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा
कोविशिल्डच का?
n कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड अत्यंत परिणामकारक आहे, असा समज
nकोविशिल्ड या लसीमध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्याची जास्त क्षमता
nलसीकरणानंतर रिॲक्शन येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून चतुर्थ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच कोविशिल्ड लस घेतली.
nइतरांना कोविशिल्ड लसपासून काहीच झालं नाही. त्यामुळे आपणही ही लस घ्यावी, असा समज.