कुकुडवाड : कुकुडवाडसह परिसरातील वाड्यांना जोपर्यंत टेंभू योजनेचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या ठराव कुकुडवाड ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
कुकुडवाडसह शिवाजीनगर, भाकरेवाडी, कारंडेवाडी, धनवडेवाडी, मस्करवाडी, नंदीनगर व आगासवाडी या वाड्यांनी एकत्र येत दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा लढा उभा केला आहे. टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा निर्धार कुकुडवाड ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे.
टेंभू योजनेचे पाणी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी व विरळी परिसरात खळाळले आहे. त्यामुळे येथील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु कुकुडवाड व परिसरातील इतर वाड्या पाण्यापासून वंचित राहिल्या असून, पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी कुकुडवाड परिसरात सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.