फलटणला विद्युत स्मशानभूमी उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:34 AM2021-04-26T04:34:49+5:302021-04-26T04:34:49+5:30

फलटण : फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडत असल्याने, कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीचा ...

Build an electric cemetery at Phaltan | फलटणला विद्युत स्मशानभूमी उभारा

फलटणला विद्युत स्मशानभूमी उभारा

Next

फलटण : फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडत असल्याने, कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे, तरी आगामी काळात फलटण नगरपरिषदेची अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमी तयार करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे केली आहे.

सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज आठ ते दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी फलटण पालिकेवर असून, मृतांची संख्या वाढल्याने, पालिका कर्मचाऱ्यांचा अंत्यसंस्कारासाठी वेळ जात आहे, तरी फलटण नगरपालिकेने विशेष सभा बोलावून अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

Web Title: Build an electric cemetery at Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.