स्टार ९६८
आरोग्य यंत्रणेचे नियोजन : विविध कारणांमुळे आजारी असलेल्यांची होणार सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यायची म्हटली की, लसीकरण केंद्र गाठावे लागते, तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र, अपंगत्व, अपघात आणि आजारांमुळे बेडवरून उठताही येत नसलेल्यांच्या लसीकरणाचा बिकट प्रश्न सर्वांसमोरच उभा ठाकला होता. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घराजवळील केंद्रावर किंवा घरी जाऊन लस देण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. मात्र, महापुरामुळे पुढे आणखी काही दिवस तरी याबाबतची कार्यवाही करण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात १ ते १७ वर्षे वयोगट वगळता सर्वांना कोरोना लढ्यात ढाल ठरणारी लस दिली जात आहे. मात्र, १८ वर्षांवरील अनेक व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहत आहेत. लसीकरणापासून दूर राहिले तर अशा व्यक्ती कोरोनासाठी हायरिस्क ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींना लसीकरणासाठी केंद्रावर घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागते. काहींनी ही कसरत पार पाडून लस घेतली आहे. मात्र, अद्यापही शेकडो व्यक्ती लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे अंथरूणावर खिळून असलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी सुरू आहे. त्यासाठी पूरपरिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जिल्हाभर अशा व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
चौकट :
हायरिस्कमध्ये कोण?
वृद्धत्व, अपंगत्व, पॅरालिसिस, सेलेबल पारसी, अपघात आणि इतर आजारांमुळे अनेकजण अंथरूणाला खिळून आहेत. अशा व्यक्तींना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेकडून नियोजन सुरू आहे.
पॉइंटर :
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस :
दोन्ही डोस :
६० पेक्षा जास्त वयोगट
मला लस कधी मिळणार?
झाडावरून पडून झालेल्या अपघातात माझ्या कमरेच्या खालील बाजूच्या सर्व जाणिवा गेल्या. बाहेर कुठंही जायचं म्हटलं तर स्ट्रेचर गरजेचा असतो. कोविड काळात हायरिस्क पेशंट असल्याने बाहेर जाऊन लस दिली नाही; पण शासनाने घरी येऊन लसीकरण करण्याचं ठरविल्याने लस मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या.
- वसंत साबळे, दौलतनगर
-
कोट
- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक