कोविड स्मशानभूमीचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:41 AM2021-04-23T04:41:29+5:302021-04-23T04:41:29+5:30

फलटण : फलटण शहरानजीक कोळकी येथे असणाऱ्या कोविड स्मशानभूमीचा त्रास आसपासच्या नागरिकांना होणार नाही, याची काळजी प्रशासनाने ...

Care should be taken not to disturb the Kovid cemetery | कोविड स्मशानभूमीचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी

कोविड स्मशानभूमीचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी

Next

फलटण : फलटण शहरानजीक कोळकी येथे असणाऱ्या कोविड स्मशानभूमीचा त्रास आसपासच्या नागरिकांना होणार नाही, याची काळजी प्रशासनाने त्वरित घ्यावी अन्यथा आंदोलन उभे करू,’ असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज कोरोनासारख्या महाभयंकर वैश्विक आजारासाठी प्रशासनाने कोळकी येथील स्मशानभूमी अधिग्रहण केली आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना, लोकांचे मृत होण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. रोज कोळकीच्या स्मशानभूमीमध्ये आठ ते दहा लोकांचे दहन केले जात आहे. यामुळे या परिसरातील वाडी-वस्तीवर महिला, पुरुष व लहान मुलांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. रोजच्या होणाऱ्या या त्रासामुळे स्मशानभूमीच्या शेजारी असणाऱ्या शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर येत नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. स्मशानभूमीच्या शेजारूनच कालवा जात असल्यामुळे त्याची राख कालव्यात टाकली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. या परिस्थितीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून स्मशानभूमीच्या कडेला पत्रे लावून किंवा त्या ठिकाणी लोकांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी जयकुमार शिंदे आणि ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ,

रामभाऊ शेंडे, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रणजित जाधव, प्रदीप भरते, गोरख जाधव, अजय भुजबळ, नीलेश भुजबळ, विजय भुजबळ, महेश भुजबळ, राजेंद्र पोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. याबाबत लवकरात लवकर प्रशासनाने निर्णय न घेतल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेतील, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

Web Title: Care should be taken not to disturb the Kovid cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.