Corona in satara : सावधान! ! साताऱ्यात आढळला कोरोनाचा तिसरा रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:54 PM2020-04-02T20:54:41+5:302020-04-02T20:58:26+5:30
साताऱ्यात गुरुवारी एका पस्तीस वर्षीय युवकाला कोरोना झाल्याची स्पष्ट झाले आहे हा तिसरा रुग्ण आहे
सातारा - कृष्णा मेडिकल कॉलेज येथे बुधवारी दाखल झालेल्या एका ३५ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून इतर दाखल १०४ पैकी ९७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर चार जणांचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.
सातारा जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी २ कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर मोठी खबरदारी घेण्यात आली होती. आठ दिवसानंतर कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.
मात्र, इतर १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत १०४ जण दाखल झाले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात ७३ तर कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये ३० रुग्ण दाखल आहेत. तर ९७ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
होम क्वारंटाईन लोकांची संख्या ५५४ असून त्यापैकी १४ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींची संख्या ही ४०१ आहे.