सीसीटीव्हीचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:00+5:302021-05-14T04:39:00+5:30
कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. गावातील मुख्य चौकात हालचालींवर चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ...
कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. गावातील मुख्य चौकात हालचालींवर चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवला जात आहे. या कॅमेऱ्यांच्या ऑपरेटिंगची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून पार पाडली जात आहे.
वीजपुरवठा खंडित
पाटण : कृषिपंपाचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. रात्री-अपरात्री शेतकरी शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी जात असतात. वीज नसल्याने त्यांची निराशा होत आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
पाटण : पाटण ते चाफोली रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाटणच्या पश्चिम बाजूकडे चिपळूण महामार्गापासून चाफोली रस्त्याला सुरुवात होते. दोन-दोन फुटांचे खोल आणि आकार वाढत चाललेले खड्डे वाहनधारक व प्रवाशांना सध्या त्रासदायक ठरत आहेत.