चंद्रकांतदादांची सावध खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:05 PM2018-05-13T23:05:50+5:302018-05-13T23:05:50+5:30

Chandrakant Dash | चंद्रकांतदादांची सावध खेळी

चंद्रकांतदादांची सावध खेळी

Next

प्रमोद सुकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : शुक्रवारी रात्रीची वेळ.. कºहाडला वाखाण रस्ता परिसरात एका लॉनवर पडलेले एलईडीचे प्रकाशझोत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते. उत्सुकतेपोटी चौकशी केली असता पाटलांच्या हिरवळीवर राजकीय क्रिकेटचा सराव होणार असल्याचे समजले. रात्री पावणेअकरा वाजता मंत्री चंद्रकांत पाटील आल्यावर खेळ सुरू झाला. जयवंत पाटील यांनी सुरुवातीलाच जलद गोलंदाजी केली. राजेंद्र यादव यांनी मध्यम गतीचे बॉल टाकले तर कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांनीही सावधच बॅटिंग करीत इथली मॅच कशी जिंकायची? याचे धडेच जणू अतुल भोसले अन् शेखर चरेगावकर यांना दिले, असेच म्हणावे लागेल.
रात्री आठ वाजल्यापासून कºहाड पालिकेचे राजकीय ‘खेळाडू’ अन् शहरातील क्रीडाप्रेमी येथे दाखल व्हायला सुरुवात झाली; पण खेळ काही सुरू होईना. तेव्हा कोल्हापूरचे पाटील येणार असल्याचे समजले. रात्री उशिरा पावणेअकरा वाजता ते आल्यावर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हिरवळीवर अखेर खेळ सुरूच होता.
पालिकेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पाटील शनिवारी कºहाडात दाखल झाले.. ‘यशवंत’रावांच्या भूमीत भाजपला ‘जयवंत’ व्हायचे असेल तर अगोदर पाटलांच्या घरी स्नेहभोजन घेऊनच सुरुवात करावी लागेल. हे त्यांना चांगलंच माहिती होतं. मंत्री पाटील यांच्या स्वागताची लगबग सुरू होती. त्याची चर्चा शहरभर पोहोचली होती. उशीर झाला तरी जनशक्तीचे ‘मेहरबान’ पाटील यांची वाट पाहत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुख्याधिकारी डांगेंनी विकासकामांचा आढावा सादर केला. त्यानंतर उपनगराध्यक्ष पाटील यांनी जलद गोलंदाजी करत पूर्वीच्या सरकारपेक्षा आत्ताच्या भाजप सरकाने कमी वेळात चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून २२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजूनही ‘दादा’ निधी देण्यास कमी पडणार नाहीत. फक्त कºहाडात भाजपची ताकद वाढली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर राजेंद्र यादव व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
या साºयानंतर चंद्रकांत पाटील बॅटिंगसाठी उभे राहिले. काही माणसांना काम करता येतं; पण ते मांडता येत नाही. काहींना मांडता येतं; पण प्रत्यक्षात करता येत नाही. मात्र, राजेंद्र यादवांकडे हे दोन्ही गुण असल्याचे सांगत फटकेबाजीला सुरुवात केली. त्याला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला. ते पुढे म्हणाले, ‘अखंड महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे तुमच्या मागणीप्रमाणे जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू,’ असे सांगत चांगली कामे केल्यावर माणस आपोआप आपल्याबरोबर येतात, असे डॉ. अतुल भोसलेंकडे बघत त्यांनी सांगितले. त्यावेळीही खसखस पिकली.
भोसले व चरेगावकर हे तर मार्गदर्शकच : राजेंद्र यादव
यावेळी राजेंद्र यादवांनी मध्यम गतीचा बॉल टाकत चंद्रकांत पाटील येथे आले म्हणजे ‘जणू सरकार आपल्या दारी’ आलं आहे. असं सांगत तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहेत आणि आमची झोळी काही फाटकी नाही. तेव्हा भरघोस निधी द्या ! अशी मागणी केली. त्याचवेळी डॉ. अतुल भोसले व शेखर चरेगावकर हे तर आमचे मार्गदर्शकच असल्याचे मंत्री पाटील यांना सांगितले.
..अन् हशा पिकला
कार्यक्रमादरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘या ठिकाणी साºयांच वक्त्यांनी कºहाड शहराच्या विकासासाठी माझ्याकडे निधीची मागणी केली. हे ऐकून बरं वाटलं. पण तुम्हाला सांगतो, आम्ही विकास निधी देताना पार्टी, पक्ष, गटतट काही पाहत नाही. हवे तर पृथ्वीबाबा चव्हाण अन् बाळासाहेब पाटील यांना विचारा,’ मग ते सांगतील, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Web Title: Chandrakant Dash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.