दहिवडी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पारित केलेल्या संचारबंदी तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १२ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींनी विहित केलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ हॉटेल चालवणे, मास्कचा वापर न करणे, दारू पिऊन वाहन चालवणे यांसारखे नियमबाह्य प्रकार केले असून, त्यामध्ये सूर्यकांत संपत खरात (रा. दहिवडी), संदीप लक्ष्मण आवळे (रा. पिंगळी बुद्रूक), प्रशांत जगन्नाथ पवार (रा. दहिवडी), रोहिदास टिपू राठोड (रा. दहिवडी), अर्शद उस्मान शेख (रा. दहिवडी), अनिल शिवाजी माने (रा. बिदाल), महेश महादेव इदाते (रा. दहिवडी), शुभम संजय जाधव (रा. आंधळी), दत्तात्रय अरुण शिंदे (रा. दहिवडी), रुपेश तुकाराम भोसले (रा. बिजवडी), चंद्रकांत लक्ष्मण चव्हाण (रा. मोगराळे) आणि हनुमंत महादेव कदम (रा. शिंगणापूर) या व्यक्तींचा समावेश असून, त्यांना प्रत्येकी २,२०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस नाईक नीता पळे, महिला पोलीस नाईक नेहा कोळेकर, महिला पोलीस नाईक सौजन्या मोरे, महिला पोलीस नाईक रूपाली फडतरे यांनी केला आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केलेले आहे.