चव्हाण महाविद्यालयाने संस्कार मूल्ये रुजविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:39 AM2021-01-23T04:39:53+5:302021-01-23T04:39:53+5:30
तळमावले (ता. पाटण) येथे काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात स्वामी विवेकानंद सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत ...
तळमावले (ता. पाटण) येथे काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात स्वामी विवेकानंद सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अरुण गाडे अध्यक्षस्थानी होते. ताईगडेवाडीच्या सरपंच शोभाताई भुलूगडे यांच्या हस्ते चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन झाले, तर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ ग्रामस्थ यशवंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संजय लोहार उपस्थित होते.
या सप्ताहानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, शिवप्रेमी मनोहर यादव यांचे दुर्ग संवर्धन यावरती व्याख्यान झाले. तसेच भागात अतिशय चांगले कवी असून, त्यांच्यासाठी खुल्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची माहिती प्राचार्य डॉ अरुण गाडे यांनी यावेळी दिली. प्रा. सचिन पुजारी यांनी प्रास्ताविक केले. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.