Children's Day 2019: शाळकरी विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर ‘हॅलोविन पार्टी’चं भूत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:18 AM2019-11-14T05:18:12+5:302019-11-14T05:18:20+5:30
लहान मुलांच्या डोक्यातील भूताकेतांची अगंतुक असलेली भीती काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेली हॅलोविन पार्टी साताऱ्यात दाखल झाली आणि याविषयी दोन मतप्रवाह पुढे आले.
सातारा : लहान मुलांच्या डोक्यातील भूताकेतांची अगंतुक असलेली भीती काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेली हॅलोविन पार्टी साताऱ्यात दाखल झाली आणि याविषयी दोन मतप्रवाह पुढे आले. भान ठेवून केलेलं अनुकरण चांगलं, असं कोणी म्हणतं तर अशा पार्ट्या चंगळवादाचा पाया ठरतील, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.
जगभरात ३१ आॅक्टोबर हा दिवस ‘हॅलोविन डे’ म्हणून शाळांमध्ये साजरा केला जातो. हे साजरीकरण पाश्चात्य देशातील असलं तरीही त्याचा प्रसार साताºयासारख्या शहरामध्ये झाला आहे. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ही पार्टी रंगू लागली अन् त्याची तुफान क्रेझ साताºयात निर्माण झाली. यंदाही दिवाळी सुटीनंतर हा दिवस शहरातील काही शाळांमध्ये साजरा करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांतून भारतीय संस्कृतीवर घाला घालणारी हॅलोविन पार्टी पालकांवर लादू नका, अशी भूमिका घेण्यात आली आहे. तर इतकंच आपल्या संस्कृतीविषयी वाटतं तर मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जांच्या इंग्रजी शाळेत घालू नका, असे मत पुढे आले आहे.
>याची मुख्य संकल्पना कोणती ?
लहान वयात मुलांचे मन खंबीर करून त्यांना भूतांच्या संकल्पनेविषयी स्पष्ट माहिती देता यावी, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. अंधार बघितला की मुलांच्या मनात येणाºया भयावह संकल्पना भ्रामक असतात, हे उदाहरणांसह स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे.
>कुठं होते पार्टी?
हॅलोविन पार्टी खूप पूर्वीपासून शाळेत करण्यात येत होती. अलीकडच्या काही दिवसांत मात्र घर, हॉटेल, दुर्गम ठिकाणावरील पडक्या घरात या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. ही पार्टी करताना कमी प्रकाश ठेवला जातो, यामुळे भूतांचा भयावह फिल येतो, असं मुलं सांगतात.
>कशी असते पार्टी?
हॅलोविन पार्टीत भोपळ्याला विशेष महत्त्व आहे. भोपळ्याला भयस्वरुपात कापून त्यांचा आकार भूतासारखा केला जातो. काहीजण यात भुतांचे चेहरे, भुतांचे भाष्य रेखाटतात. पोकळ भोपळ्यात विद्युत प्रकाश सोडला तर त्याचे भयावह चित्र भिंतीवर प्रतिबिंबित होतं.
>समर्थनाची कारणे
जगभरातील ट्रेन्ड असल्याने विरोध अयोग्य एखादं साजरीकरण आवडत नसेल तर ते पूर्ण अमान्य करण्यापेक्षा त्यातील त्रुटी दूर करा. देवाचे उत्सव होत असतील तर या साजरीकरणाचं का वावडं? परदेशी संस्कृतीचं आक्रमण वाटत असेल तर मराठी माध्यमांचा पर्याय निवडावा. पाश्चात्य देशात आपले सण साजरे करतात, त्याचं कौतुक मग आपण त्यांचं काही साजरं केलं तर विरोध का?
>विरोधाची कारणे
लहान वयातच मुलांच्या डोक्यात पाटीर्चं खुळ रुजायला नको. मुळात आपल्याकडे ढीगभर सण असताना याचं साजरीकरण कशासाठी? पाश्चात्य देशांचं वाढतं आक्रमण किमान बाल वयात तरी रोखलं जावं.भारतीय संस्कृतीत भूत, चेटकीण वाईट आहेत तर आपण त्यांच्यासारखं बनून मिरविण्यात काय अर्थ आहे? दहा वर्षांच्या आतील मुलांसाठी असलेल्या या साजरीकरणात पौगंडावस्थेतील मुलं आणि महिलांचाही सहभाग धोकादायक वाटतो.
>हॅलोविन म्हणजे नेमकं काय?
युरोपियन देशात हॅलोविनचा उगम आढळतो. हा दिवस अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भूत, चेटकीण यांच्या रुपाने बालवयात असलेली भीती कायमस्वरुपी काढण्यासाठी दहा वर्षांच्या आतील मुलांसाठी याचे आयोजन केले जात होते. भारतात आंतरराष्ट्रीय शाळा दाखल झाल्या आणि ‘हॅलोविन’ हा उत्सव या शाळांमधून पुढे येऊ लागला. शाळेपुरती मर्यादित असलेली ही पार्टी अनेकांच्या घरांमध्ये शिरली.
>सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर हॅलोविन पार्टी करण्यासाठीच्या आयडिया सांगणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. चकमकीत पत्रावळीपासून दातांचे सुळे, चेटकणीचे बूट, स्ट्रॉपासून मोठी नखं कशी तयार करता येतात, हे दाखविण्यात आले आहे. काही व्हिडीओंमध्ये तर घराचं खास हॅलोविन स्पॉट कसा करता येऊ शकतो, हे दाखविलं आहे.
>साताºयातील काही शाळांमध्ये हॅलोविन पार्टी केवळ मोठ्या गटापर्यंतच केली जाते. पहिलीनंतर ही पार्टी साजरी केली जात नाही. याला संस्कृतीवरचा घाला असं संबोधणं चुकीचं आहे. अशी ज्यांची धारणा आहे, त्यांनी पाल्याला मराठी माध्यमात शिकायला पाठवणं उत्तम.
- रेणू येळगावकर, पालक, सातारा
काही शाळांमध्ये पालकांचा विरोध असतानाही सक्तीने या पार्टीत सहभागी होण्याचा अट्टाहास शाळा व्यवस्थापनाकडून केला जात आहे. बालवयात श्रमाचे संस्कार करण्यापेक्षा हे पाटीर्चे संस्कार पिढीला वेगळ्या दिशेकडे नेण्याचा धोका संभवतो.
- प्रशांत मोदी, सजग फाउंडेशन, सातारा
आईच्या मैत्रिणीकडे मी पहिल्यांदा या पाटीसार्ठी गेलो. पाटीसार्ठी ड्रॅक्युलाचा चेहरा करण्यासाठी खूप मेहनतही घेतली. वेगळ्या थीमची ही पार्टी दंगामस्तीयुक्त होती. आपल्याकडचा पितृपंधरवडा आणि पाश्चात्यांचे हॅलोविन साजरे करण्याची भावना एकच आहे, फक्त साजरीकरण भिन्न आहे.
- आर्यन गुरव, विद्यार्थी
अंधारात भूत आणि ते कुरूप ही माझी धारणा होती; पण या पाटीर्ला गेल्यानंतर भूत अस्तित्वात नाही, याची जाणीव झाली. आपल्याकडून चांगले वर्तन व्हावे, यासाठी या संकल्पना रुढ झाल्याचंही पार्टी करताना समजलं.
- कृतिका प्रभुदेसाई, विद्यार्थिनी