शाहुपुरीत पथदिवे दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:41 AM2021-05-11T04:41:03+5:302021-05-11T04:41:03+5:30
करंजे : शाहुपुरीतील नादुरुस्त पथदिवे तातडीने बदला, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी नगर परिषदेला केल्या. सातारा नगर परिषदेच्या ...
करंजे : शाहुपुरीतील नादुरुस्त पथदिवे तातडीने बदला, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी नगर परिषदेला केल्या.
सातारा नगर परिषदेच्या हद्दवाढीत शाहुपुरी ग्रामपंचायत समाविष्ट
झाल्यापासून शाहुपुरी ग्रामपंचायत हद्दीतील नादुरुस्त पथदिवे बदलायचे काम
रेंगाळले होते. त्यासंदर्भात माजी पंचायत समिती उपसभापती संजय पाटील,
पंचायत समिती सदस्य वसुंधरा ढाणे, शाहुपुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश आरडे, माजी सरपंच अमृता प्रभाळे, माजी उपसरपंच रमेश धुमाळ, अमित कुलकर्णी, सुधाकर यादव, शंकर किर्दत, राजेंद्र गिरी, काळभैरव
पॅनलच्या माजी ग्रामपंचायत सदस्या धनश्री ग्रामोपाध्ये, मुग्धा पुरोहित, मयूरा कुलकर्णी, लता राजापुरे, लीलाताई शितोळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन नादुरुस्त पथदिवे तातडीने बदलून त्या जागी नवीन पथदिवे बसवणे गरजेचे
आहेत, हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खासदार उदयनराजे यांनी
नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे
शाहुपुरी हद्दीतील सर्व नादुरुस्त पथदिवे बदलण्याच्या कामास सुरुवात झाली
आहे.
फोटो..
१० करंजे पथदिवे