खटाव : कोरोनाच्या कहर नंतर आता बांधकाम व्यवसाय सुरळीत झाला आहे. परगावाहून आलेल्या कामगारांना आता कुठे काम सुरू झाले आहे. या कामगारांनी आपली माहिती ऑनलाईनच्या माध्यमातून नावनोंदणी करून शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे,’ असे आवाहन डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी केले.
खटावमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार महेश शिंदे, राहुल पाटील, माधुरी माने, सोमनाथ राजे, कस्तुरी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगारांची रजिस्टर नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. हे करत असताना त्यांना त्यांच्या वेळेनुसार बाहेर पडल्यानंतर येणाऱ्या अडचणी पाहता त्यांचा वाया जाणारा वेळ व त्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता नवीन कामगारांची नोंद या एकाच नेट कॅफेमध्ये करून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील,
तसेच राहुल पाटील यांनी सद्यस्थितीत ५०० नवीन कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून सातारा पोवई नाका येथील शासकीय कार्यालयात पाठवण्यात आली असल्याचे सांगितले.
१८खटाव
कॅप्शन : बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करताना डॉ. प्रिया शिंदे, समवेत माधुरी माने
उपस्थित होते.