फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी फलटण येथे उपलब्ध नसल्याने अनेकांनी भ्रमणध्वनी व सोशल नेटवर्कद्वारे संपर्क साधून शुभेच्छा दिल्या.
भाजपची महत्त्वाची बैठक आणि अन्य कामांसाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर दिल्लीत होते. त्यामुळे अनेकांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार जयराम स्वामी, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार राहुल कुल, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष विष्णू लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, सुभाष गुळवे, तुकाराम शिंदे, सिराज शेख, दत्तराज फडतरे, बबलू कदम, मगनदास महाडिक, अभिजित नाईक-निंबाळकर, रोहित नागटिळे, मेहबूब मेटकरी, जावेद शेख, बापूराव रणवरे, नरसिंह निकम, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब देशमुख, तुकाराम ढमाळ, विलासराव झणझणे, हणमंतराव मुळीक, दिलीप राऊत, विलास चव्हाण, राजेंद्र धुमाळ, लहूराज मोहिते, जाकीर मणेर, वसीम इनामदार यांनी शुभेच्छा दिल्या. (वा.प्र.)