दहिवडीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे दिलीपराव जाधव बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:02 AM2019-06-15T00:02:31+5:302019-06-15T00:04:22+5:30

दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी दिलीपराव जाधव यांची तर उपनगराध्यक्षपदी सुप्रिया शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, भंडारा व गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली.

 Congress's Diliprao Jadhav uncontested as president of Dahivadi city | दहिवडीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे दिलीपराव जाधव बिनविरोध

दहिवडीच्या नगराध्यक्षपदी दिलीपराव जाधव,उपनगराध्यक्षपदी सुप्रिया शिंदे यांची निवड झाली. त्यानंतर आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे, सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कोरेगावच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रेश्मा कोकरे यांचा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, नगरसेवक व महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देगुलालाची उधळण : सुप्रिया शिंदे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोधकोरेगाव नगरपंचायत : नगराध्यक्षापदी रेश्मा कोकरे तर संगीता बर्गे उपनगराध्यक्षा

दहिवडी : दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी दिलीपराव जाधव यांची तर उपनगराध्यक्षपदी सुप्रिया शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, भंडारा व गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली.

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या दिलीपराव जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला होता. त्यामुळे त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती. शुक्रवारी दुपारी पिठासन अधिकारी उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिलीपराव जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची प्रक्रिया सुरू झाली. उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सुप्रिया शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हलगी, गजी व वाद्यवृंदांसह फटाक्यांची आतषबाजी, भंडारा व गुलालाची उधळण करत सजवलेल्या ट्रॉलीतून मिरवणूक काढण्यात आली.
आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे, माजी सभापती अतुल जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण गोरे, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे, अर्चना खरात, माया खताळ, ललिता जाधव, नीलम शिंदे, वैशाली कदम कोकरे यांच्यासह सर्व नगरसेवक सहभागी झाले होते.

मिरवणुकीत नगरसेवक धनाजी जाधव, सतीश जाधव, रवींद्र सकुंडे, समीर योगे, लक्ष्मण कोकरे, उत्तम खताळ, महेश कदम, शिवाजी शिंदे, रमेश जाधव, अनिल जाधव, चारुदत्त साखरे, किसन जाधव, राहुल धर्माधिकारी, संदीप जाधव सहभागी झाले होते.


काँग्रेस-राष्टवादी आघाडीची सरशी

कोरेगाव नगरपंचायत : नगराध्यक्षापदी रेश्मा कोकरे तर संगीता बर्गे उपनगराध्यक्षा

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीत काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या रेश्मा सुनील कोकरे यांची नगराध्यक्षपदी तर संगीता नवनाथ बर्गे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब बाचल यांच्यासह विद्यमान नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे व काँग्रेसचे नगरसेवक गैरहजर राहिले. निवडीनंतर शहरातून गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.

पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत संगीता बर्गे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी बारा वाजता नगरसेवकांची बैठक झाली. त्यामध्ये काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा कोकरे यांच्यासह १२ नगरसेवक उपस्थित होते. काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब बाचल, विद्यमान नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह महेश बर्गे, साक्षी बर्गे व शुभांगी बर्गे हे नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे कोकरे यांच्या निवडीची औपचारिकता राहिली होती.

उपनगराध्यक्षपदासाठी संगीता बर्गे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे नलावडे यांनी जाहीर केले. निवडीनंतर शहरातून गुलालाची उधळण करत विजयी मिरवणूक काढण्यात आली.निवड प्रक्रियेत प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांना मुख्याधिकारी विनायक औंधकर, नायब तहसीलदार अमर रसाळ, अव्वल कारकून सारंग जाधव, अजित शेंडे, कार्यालय अधीक्षक प्रताप खरात, बाळासाहेब सावंत यांनी सहकार्य केले.

बाचलांसाठी हात खाली
प्रांताधिकारी नलावडे यांनी हात उंचावून मतदान घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला बाळासाहेब बाचल यांचे नाव घेण्यात आले. त्यावेळी कोणी हात वर केला नाही. त्यानंतर रेश्मा कोकरे यांचे नाव घेण्यात आले. सर्वच नगरसेवकांनी हात वर केले. सर्व सदस्यांच्या मतदानाची मोजणी करून कोकरे यांची निवड जाहीर केली.

 

देशपातळीवर काँग्रेस-राष्टवादीची आघाडी झाली असून, नगरपंचायतीतही आघाडी केली आहे. अडीच वर्षांत काम झाले नाही, त्यापेक्षा अधिकपटीने काम केले जाईल. स्वच्छ व पारदर्शक कारभाराद्वारे जनतेची कामे मार्गी लावली जातील.
- शशिकांत शिंदे, आमदार.

कोरेगाव शहरातील सतरा प्रभागांमध्ये ठोस विकासकामे केली जाणार आहेत. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. शहर स्वच्छतेबरोबरच नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा वेळेत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
- किरण बर्गे



 

Web Title:  Congress's Diliprao Jadhav uncontested as president of Dahivadi city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.