जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. राजकीय, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच विवाह समारंभासारख्या सोहळ्यांनाही मर्यादा आणल्या आहेत. संक्रमण रोखण्याचा त्याद्वारे प्रयत्न होत आहे. मात्र, एवढे करूनही अद्याप रुग्णसंख्या घटलेली नाही. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर आता निर्बंध आणखी कडक करण्यावर प्रशासनाने भर दिला असून, कऱ्हाडातील सर्व उद्याने पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार शनिवारपासून उद्याने कुलूपबंद करण्यात आली आहेत.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे करणारे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व त्यांची वाहने, शासकीय व अन्य सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालिका मुख्याधिकारी तसेच पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना हा आदेश पुढील कार्यवाहीसाठी निगर्मित करण्यात आला आहे.
- चौकट
बंद करण्यात आलेली उद्याने
१) दिवंगत पी. डी. पाटील उद्यान
२) प्रीतीसंगम बगीचा
३) टाऊन हॉल बगीचा
४) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
फोटो : २९केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडातील प्रीतीसंगम बगीच्यासह सर्व उद्याने पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात आली आहेत.