corona virus : जिल्ह्यात दोन दिवसांत ११ जणांचा मृत्यू अन १५९ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 08:35 PM2020-11-18T20:35:36+5:302020-11-18T20:36:54+5:30

coronavirs, sataranews सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ६५३ वर पोहोचला आहे. तसेच या दोन दिवसांत १५९ रुग्ण बाधित आढळून आले.

corona virus: 11 killed, 159 infected in two days in district | corona virus : जिल्ह्यात दोन दिवसांत ११ जणांचा मृत्यू अन १५९ बाधित

corona virus : जिल्ह्यात दोन दिवसांत ११ जणांचा मृत्यू अन १५९ बाधित

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात दोन दिवसांत ११ जणांचा मृत्यू अन १५९ बाधित बळींचा आकडा १६५३ वर; बरे झाले २८८

सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ६५३ वर पोहोचला आहे. तसेच या दोन दिवसांत १५९ रुग्ण बाधित आढळून आले.

जिल्ह्यात भावबीजेपूर्वी बाधितांची संख्या दिवसाला कमी आढळून येत होती. मात्र आता ही संख्या वाढतेय की काय, अशी भीती प्रशासनाला वाटू लागलीय. त्याचे कारण म्हणजे सोमवारी ४२ तर मंगळवारी ९४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रोहोत, (ता. सातारा) येथील ६८ वर्षीय पुरुष, आर्वी, (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय महिला, झरे, (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ६८ वर्षीय पुरुष, अंबरवाडी, (ता. खंडाळा) येथील ६५ वर्षीय पुरुष, बिदाल, (ता. माण) येथील ५२ वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी, (ता. वाई) येथील ७९ वर्षीय पुरुष, नंदगाने, (ता. जावळी) येथील ६२ वर्षीय महिला, दिव्यनगरी, (ता. सातारा) येथील ९० वर्षीय पुरुष, राणंद, (ता. माण) येथील ५६ वर्षीय पुरुष, चिंचणेर वंदन, (ता. सातारा) येथील ८२ वर्षीय पुरुष, आवर्डे, (ता. पाटण) येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कोरोनामुक्तीचाही वेग वाढला

जिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून, दोन दिवसांत २८८ तर आतापर्यंत ४४ हजार ९७४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

 

 

Web Title: corona virus: 11 killed, 159 infected in two days in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.