सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ६५३ वर पोहोचला आहे. तसेच या दोन दिवसांत १५९ रुग्ण बाधित आढळून आले.जिल्ह्यात भावबीजेपूर्वी बाधितांची संख्या दिवसाला कमी आढळून येत होती. मात्र आता ही संख्या वाढतेय की काय, अशी भीती प्रशासनाला वाटू लागलीय. त्याचे कारण म्हणजे सोमवारी ४२ तर मंगळवारी ९४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रोहोत, (ता. सातारा) येथील ६८ वर्षीय पुरुष, आर्वी, (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय महिला, झरे, (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ६८ वर्षीय पुरुष, अंबरवाडी, (ता. खंडाळा) येथील ६५ वर्षीय पुरुष, बिदाल, (ता. माण) येथील ५२ वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी, (ता. वाई) येथील ७९ वर्षीय पुरुष, नंदगाने, (ता. जावळी) येथील ६२ वर्षीय महिला, दिव्यनगरी, (ता. सातारा) येथील ९० वर्षीय पुरुष, राणंद, (ता. माण) येथील ५६ वर्षीय पुरुष, चिंचणेर वंदन, (ता. सातारा) येथील ८२ वर्षीय पुरुष, आवर्डे, (ता. पाटण) येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.कोरोनामुक्तीचाही वेग वाढलाजिल्ह्यात कोरोनामुक्तीचेही प्रमाण वाढले असून, दोन दिवसांत २८८ तर आतापर्यंत ४४ हजार ९७४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.