वाईमध्ये कोरोनाचा कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:04+5:302021-04-09T04:41:04+5:30
वाई : तालुक्यात बुधवारी आलेल्या अहवालात ८३ जण कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू झाला ...
वाई : तालुक्यात बुधवारी आलेल्या अहवालात ८३ जण कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. यामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचाही अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने पोलीस यंत्रणा हादरली आहे.
गुरुवारी वाई पोलीस ठाण्यातील व उपविभागीय पोलीस कार्यालयातील सर्वांची कोरोना तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत चालला असून, बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
बुधवारी वाई तालुक्यामध्ये एकूण ८३ रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यात रविवार पेठ १०, सुरुर १, बावधन १५, व्याहळी ३, धर्मपुरी २, बोरगाव १, वाई ७, गणपती आळी ६, म्हातेकरवाडी ३, वेळे १, गुळुंब २, दत्तनगर २, भुईंज २, गंगापुरी ४, मधली आळी २, सोनगिरवाडी ५, फुलेनगर २, पोलीस लाईन २, अनवडी १, मलदेववाडी १, वाखनवाडी १, खावली १, नंदगाने १, अभेपुरी १, पिंपळवाडी १, दह्याट १, बोरगाव १, आपोशी १, शेंदुरजणे १, पाचवड १ यांचा समावेश आहे.
कोट..
जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी करावा.
-आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक