CoronaVirus Lockdown : कोरोनामुळे द्राक्षउत्पादक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:24 PM2020-04-03T17:24:11+5:302020-04-03T17:26:14+5:30
कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाल्याचे दिसू लागले आहे. परिसरात परिपक्व झालेल्या द्राक्षे बागा कोरोना संसर्गाचा परिणाम व अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानाचा विपरित परिणाम आशा दुहेरी संकटात सापडल्याने द्राक्षे उत्पादित शेतकरी हवालदिल झाला आहे.
पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाल्याचे दिसू लागले आहे. परिसरात परिपक्व झालेल्या द्राक्षे बागा कोरोना संसर्गाचा परिणाम व अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानाचा विपरित परिणाम आशा दुहेरी संकटात सापडल्याने द्राक्षे उत्पादित शेतकरी हवालदिल झाला आहे.
जगभरासह महाराष्ट्रात प्रत्येक दिवसागणिक कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांची व मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब केला आहे. त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा परिणाम मानवी दैनंदिन बाबींसह शेतीवर झाला आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने बाजारपेठेत शांतता झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आपली तरकारीची पिके सोडून दिली आहेत. त्याचबरोबर अधूनमधून निर्माण होणारे ढगाळ हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल होत आहे. त्याचा जास्तीत जास्त विपरित परिणाम परिसरातील द्र्राक्ष बागांवर होत आहे.
सद्य:स्थितीत द्र्राक्ष बागा माल तोडणीच्या अवस्थेत असल्यातरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मजुरांची वानवा, वाहतूक व्यवस्थेचे संकट, व्यापारी वर्गाची माल खरेदीची अनास्था व प्रतिकूल वातावरण यामुळे बागेत असलेला माल विकला जाऊन अपेक्षित आर्थिक मिळकत होणार का? याबाबत शेतकरी वर्गामध्ये साशंकता आहे.
दरम्यान, वर्षभर प्रचंड भांडवली खर्च व काबाडकष्ट करून पिकविलेला माल कोरोना व पावसामुळे वाया जाणार की काय, या धास्तीने शेतकरी चितांग्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
सर्वच निविष्ठांच्या वाढत्या खर्चामुळे द्र्राक्ष बागांचा उत्पादन खर्च वाढत आहे. सद्य:स्थितीत माल काढणीच्या अवस्थेत असून, कोरोना व प्रतिकूल हवामान याचा विचार करून संबंधित प्रशासनाने द्र्राक्ष उत्पादक शेतकºयांना सहकार्य करण्याची गरज आहे.
-राहुल धुमाळ,
द्राक्ष उत्पादक शेतकरी