सातारा : अंत्यविधीला जाताना भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला.
मेघा शैलेश कारंडे (वय २८, रा. सोनवडी, ता. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मेघा कारंडे या पुणे येथे वास्तव्यास होत्या. सोनवडी येथे गुरुवारी त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी मेघा या त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून सोनवडी येथे येत होत्या. खंडाळा घाटामध्ये पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मेघा या दूरवर फेकल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर जखम झाली. डोक्यामध्ये जादा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांचे पतीही जखमी झाले. या अपघातानंतर दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्या ट्रकचा नंबर पोलिसांना सापडला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होती.
प्रवाशांचा जीव धोक्यात : कार भरावावरून कोसळलीतांबवे : म्होप्रे, ता. कºहाड येथे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कारचा विचित्र अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याच्या भरावावरून लगतच्या शेतात घुसली. या अपघातात चालकासह लहान मुले व महिला जखमी झाली असून, गत अनेक महिन्यांपासून या मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे.
विजापूर-गुहाघर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात उकराउकरी केली आहे. त्यामुळे रस्त्यानजीक वास्तव्यास असणाºया ग्रामस्थांना धुळीचा मोठा त्रास होतो आहे. यातच रस्त्यावर सुरक्षा म्हणून ठेकेदाराने काही सोय केली नाही. साधे रिफ्लेक्टरही बसवले नाहीत. रस्त्याच्या एकूण खर्चाच्या दहा टक्के खर्च हा सुरक्षेसाठी करायचा असतो. तो ठेकेदार करत नाही. म्होप्रे येथे गुरुवारी रस्त्याकडेला सुरक्षा नसल्याने एका कारचा अपघात झाला. म्होप्रे येथे रस्त्याचे काम सुरू आहे.
मात्र, धुरळ्यावर ठेकेदार पाणी मारत नाहीत, यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांसह प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार होत आहेत. रस्त्यावर छोटा पूल बांधला आहे. मात्र, त्या पुलाच्या तारा उघड्या पडल्या आहेत. यामुळे दुचाकी चालकांना अपघाताचा धोका आहे.
पत्नीसोबत वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाची आत्महत्या
सातारा : पत्नीसोबत वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.मानतेस वासकोटे (वय २५, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. शनिवार सातारा) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मानतेस हा पत्नी आणि दोन मुलांसोबत गेल्या काही वर्षांपासून साताºयात वास्तव्यास होता. तसेच नवीन इमारतीच्या बांधकामावर सुरक्षा रक्षक म्हणून तो काम करत होता. दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास पत्नीसोबत त्याचा किरकोळ वाद झाला. त्यामुळे त्याने मध्यरात्री एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.
दोन टोळ्यांमधील सहाजण तडीपार
सातारा : जिल्ह्यात दारू विक्री, मारामारी, घरफोडी करणाºया दोन टोळ्यांमधील सहाजणांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा दारू विक्री व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या चेतन प्रदीप सोळंकी (वय ३१, टोळी प्रमुख, रा. सदर बझार सातारा), चंदन माणिक वाघ (वय २७, रा. टोळी सदस्य, रा. चाहूर, ता. सातारा) यांच्यासह संदीप भानुदास भिंताडे (वय २५, टोळी प्रमुख रा. जाळगेवाडी, ता. पाटण), सागर उर्फ बंडा शंकर गायकवाड (वय २७, रा. टोळी सदस्य रा. काशिदगल्ली उंब्रज, ता. कºहाड), सोन्या शाहीद शब्बीर मुल्ला (वय २२, रा. उंब्रज, ता. कºहाड), रोशन अरविंद सोनावले (वय २१, रा. उंब्रज, ता. कºहाड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोन टोळ्यांकडून सातारा शहर आणि उंब्रज परिसरात सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव निर्माण केला होता. त्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. हद्दपार प्रस्तावाची सुनावणी होऊन या टोळीतील सहाजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश दिला.या आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर ४८ तासाच्या आत त्यांना सातारा जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे.