सातारा : कारला धडक देऊन नुकसान केल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगश दिलीप फडणवीस (वय ३५, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हणमंत सुभाष किर्दत हे कारने (एमएच ११ - सीडब्ल्यू ६३५२) समर्थ मंदिर ते राजवाडा या रस्त्यावरील जानकीबाई झंवर शाळेच्या रस्त्याने निघाले होते. यावेळी योगश फडणवीस यांच्या दुचाकीची कारला धडक बसली. यात चारचाकीचे नुकसान झाले. याप्रकरणी स्वत: शाहूपुरी पोलिसांनीच गुन्हा दाखल केला असून याची तक्रार सहायक फौजदार सुभाष बरकडे यांनी दिली आहे. या तक्रारीनंतर योगेश फडणवीस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.