दहिहंडी उत्सवात डीजे वाजविणाऱ्या दोन मंडळांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 02:53 PM2019-08-26T14:53:45+5:302019-08-26T14:55:21+5:30

डीजे सिस्टीमच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना साताऱ्यात दहिहंडी उत्सवामध्ये दोन मंडळांनी डीजे सिस्टीमचा वापर केला. हा प्रकार शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन दोन सिस्टीम जप्त केल्या.

Crimes on two boards playing DJs at Dahihandi festival | दहिहंडी उत्सवात डीजे वाजविणाऱ्या दोन मंडळांवर गुन्हे

दहिहंडी उत्सवात डीजे वाजविणाऱ्या दोन मंडळांवर गुन्हे

Next
ठळक मुद्देदहिहंडी उत्सवात डीजे वाजविणाऱ्या दोन मंडळांवर गुन्हेसाऊंड सिस्टीम जप्त : शाहूपुरी पोलिसांची कारवाई

सातारा : डीजे सिस्टीमच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना साताऱ्यात दहिहंडी उत्सवामध्ये दोन मंडळांनी डीजे सिस्टीमचा वापर केला. हा प्रकार शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन दोन सिस्टीम जप्त केल्या.

करंजे येथील नवभारत गणेशोत्सव मंडळ आणि शनिमारूती मंदिर बसाप्पा पेठ येथे दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी डीजे लावण्यात आला असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ आपल्या कर्मचाऱ्यांसह तेथे धाव घेतली.

डीजे सिस्टीम तातडीने बंद करून जप्त करण्यात आली. करंजे येथील डीजे सिस्टीमप्रकरण अमर चंद्रकांत निकम (वय २५, रा. करंजे पेठ, सातारा) तर बसाप्पा पेठेतील डीजे सिस्टीमप्रकरणी युवराज विकास शिंदे (रा. शिंदेमळा, करंजे पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crimes on two boards playing DJs at Dahihandi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.