गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’ आता थेट पोलिसांच्या मोबाईलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:04 AM2019-11-25T01:04:49+5:302019-11-25T01:05:06+5:30

संजय पाटील कºहाड : गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी जेवढं अवघड, तेवढंच आरोपींचे ‘रेकॉर्ड’ मिळवणंही कठीण; पण आता आरोपींची ‘कुंडली’ ...

 Criminal record is now directly on the police mobile | गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’ आता थेट पोलिसांच्या मोबाईलवर

गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’ आता थेट पोलिसांच्या मोबाईलवर

Next

संजय पाटील
कºहाड : गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी जेवढं अवघड, तेवढंच आरोपींचे ‘रेकॉर्ड’ मिळवणंही कठीण; पण आता आरोपींची ‘कुंडली’ थेट पोलिसांच्या मोबाईलवर उपलब्ध झाली आहे. एका ‘क्लिक’वर पोलीस देशभरातील कोणत्याही गुन्हेगाराचे रेकॉर्ड पाहू शकतात. एवढंच नव्हे तर त्याच्यावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची आणि तारखांची माहितीही पोलिसांना मोबाईलवरच मिळणार आहे.
देशभरातील पोलीस दलासाठी ‘कोर्ट चेकर’ हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ सध्या उपलब्ध झालंय. पोलिसांना ते देण्यातही येतय. तसेच हे ‘अ‍ॅप’ कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ‘व्हेरीफाय टष्ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ टीमचे मितेश कदम व त्यांचे सहकारी घेतायत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे पूर्वीचे गुन्हेगारी ‘रेकॉर्ड’ मिळविण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या ‘पब्लिक डोमेन’वर अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. ही माहिती तपासतानाही अनेक तांत्रिक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे ही माहिती तत्काळ मिळविण्यासाठी आधुनिक पद्धती उपलब्ध व्हावी, अशी पोलिसांची मागणी होती.
अखेर गुन्हेगारांची संपुर्ण माहिती असलेले ‘कोर्ट चेकर’ हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ बनविण्यात आले आहे. यापूर्वी ‘टष्ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ या संकेतस्थळाचा व ‘अ‍ॅप्लिकेशन’चा पोलीस दलाकडून वापर होत होता. मात्र, त्यामधीलच आधुनिक आवृत्ती असलेले ‘कोर्ट चेकर’ हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे.
कºहाडातील मितेश कदम यांच्यासह त्यांच्या टीमकडून सुरुवातीला सातारा जिल्ह्यात या अ‍ॅपबाबतच्या कार्यशाळा घेतल्या जातायत. यापुढे प्रत्येक पोलीस ठाण्यात अशी कार्यशाळा घेतली जाणार आहे.
फक्त पोलीसच वापरू शकतात हे ‘अ‍ॅप’
हे अ‍ॅप्लिकेशन बनविताना पोलीस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलवर ‘इन्स्टॉल’ करून घेतल्यानंतर त्या ‘डाऊनलोडर’ची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलीस असली तरच त्या व्यक्तीला अ‍ॅप्लिकेशनमध्ये ‘साईन इन’ करता येणार आहे. आॅनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय ते अ‍ॅप वापरताच येणार नाही. त्यामुळे त्याचा दुरुपयोगही होणार नाही.
फोटोवरूनही होणार ओळख
‘कोर्ट चेकर’मध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन ‘फिचर’ या अ‍ॅपमध्ये उपलब्ध केले जाईल.

Web Title:  Criminal record is now directly on the police mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.