कोपर्डे हवेली परिसरात घरांच्या पडझडीसह पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:05+5:302021-07-25T04:33:05+5:30
कोपर्डे हवेली : सतत तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. कोपर्डे हवेली येथील राजेंद्र ...
कोपर्डे हवेली : सतत तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले.
कोपर्डे हवेली येथील राजेंद्र ज्ञानू पाटील यांच्या घराची भिंत पडली आहे. श्रीपती भीमराव चिकने यांच्या घरांची भिंत पडली असून संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे. तर परिसरात अनेक शेतकऱ्यांचे उसाचे पीक भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. टोमॅटो, वांगी, काकडी, फुलांच्या बागा आदी पिकांत पाणी साचून राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे.
नुकत्याच भातांच्या रोपांच्या लावणी झालेल्या भात पिकात पाणी साचून राहिल्याने भात पिकांचे काय होणार, या विषयी शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.
फोटो
२४ कोपर्डे हवेली
कोपर्डे हवेली येथील श्रीपती चिंकणे यांच्या घराची भिंत पडली आहे. (छाया : शंकर पोळ)