रसायनशास्त्र विभागाचे ऑनलाइन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:27+5:302021-06-19T04:26:27+5:30
वाई : येथील जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथे रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत मूल्यमापन हमी कक्ष विभाग ...
वाई : येथील जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथे रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत मूल्यमापन हमी कक्ष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १९ रोजी नॅनोसायन्स ॲण्ड नॅनोटेक्नॉलॉजी या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील हे बीजभाषक म्हणून सहभागी होणार आहेत. उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सुशीलकुमार जाधव हे नॅनोमटेरीअल या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या विषयाचा लाभ अनेक क्षेत्रातील लोकांना होणार आहे. तेव्हा सर्व विषयप्रेमींनी, प्राध्यापकांनी व अभ्यासकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. हणमंतराव जाधव यांनी केले आहे.