अल्पवयीन तरुणांची व्यसनाधीनता समाजाला भेडसावणारी मोठी समस्या
By admin | Published: October 4, 2015 09:20 PM2015-10-04T21:20:12+5:302015-10-05T00:16:47+5:30
शैला दाभोलकर : वाई येथील कार्यक्रमात केले मत व्यक्त
वाई : समस्या सोडविण्यासाठी आजची पिढी व्यसनाचा आधार घेते, व्यसन करणे ही समस्या सोडविण्याचा उपाय होऊ शकत नाही़ अल्पवयीन व्यसनाधीनता ही समाजाला भेडसावणारी मोठी समस्या आहे, त्यावर योग्य उपाय शोधणे आज काळाची गरज आहे,’ असे मत डॉ. शैला दाभोलकर यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त आयोजित व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी प्रभारी प्राचार्य डॉ़ रामचंद्र ढेकळे होते़ याप्रसंगी समाजकल्याण विभागाचे निरीक्षक डी़ एस़ पाटील, उपप्राचार्य प्रा़ चंद्रकांत पाटील, पर्यवेक्षक प्रा़. देवानंद शिंगटे, प्रा़ सुरेश महांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी युवकांनी व्यसनांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले़ दाभोलकर यांनी त्याला समर्पक उत्तरे देत शंकांचे निरसन केले. प्रा़ सुरेश महांगडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौरी पोरे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)