उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:25+5:302021-06-19T04:26:25+5:30

परळी जिल्ह्यात माॅन्सूनचे धमाकेदार आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या कोसळधारा बरसत असल्याने काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले ...

Discharge of water from Urmodi dam | उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग

उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग

Next

परळी

जिल्ह्यात माॅन्सूनचे धमाकेदार आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या कोसळधारा बरसत असल्याने काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागल्याने धरणक्षेत्रातही पाण्याची चांगलीच आवक वाढली आहे. उरमोडीतही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाचे चारही वक्र दरवाजांमधून उरमोडी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. परळी खोऱ्यात पावसाची संततधार सुरु असून उरमोडी धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने गुरुवार १७ जून रोजी रात्री ११ वाजता चारही वक्रद्वार ०.२५ मी उचलून ७५० व विद्युत गृह २०० असा एकूण ९५० क्यूसेक विसर्ग उरमोडी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

तसेच पावसाचा मारा कायम असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्याने शुक्रवार १८ जून रोजी सकाळी ९ वाजता वक्रद्वार क्र १ व ४ हे ०.२५ मी वरून 0.५० मी करण्यात आली. (गेट क्र १ व ४ हे ०.५० मी, गेट क्र २ व ३ हे ०.२५ मी) सध्या उरमोडी नदीपात्रात होत असलेला एकूण विसर्ग १४१३ क्यूसेक. कालवा १०० क्यूसेक. धरणातून होत असलेला एकूण विसर्ग १५१३ क्यूसेक इतका असून या कालावधीत उरमोडी नदीपात्रातून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Web Title: Discharge of water from Urmodi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.