वाई : शेतकºयांनी हरबरा व ज्वारी पिकाशेजारी थायमेट टाकल्याने दहा मोरांचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी पसरणी घाटालगत असणाºया महाविद्यालयीन मुलांच्या वसतिगृहावरील क्षेत्रात घडली. हा प्रकार बुधवारी रात्री आठ वाजता पर्यावरणप्रेमींनी उघडकीस आणला.
मोरांच्या मृत्यूला दोन दिवस झाले असल्याने भटक्या कुत्र्यांनी ते खाल्याने परिसरात मोरांचे अवशेष व पिसे पडल्याचे दिसून आले. एका मोराचे अवशेष ताब्यात घेऊन गुरुवारी सकाळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. मोराचे अवशेष तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी सांगितले़ एकाच ठिकाणी येवढ्या प्रमाणात मोरांचा मृत्यू झाल्याने पर्यावरणपे्रमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे़
डिसेंबरनंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शेतीक्षेत्रात येतात. त्यामुळे शेतकरी पिकांना वन्यप्राण्यापासून असणारे संभाव्य धोके ओळखून व पिकांचे संरक्षण करण्यासाठी चुकीच्या पद्धतीच्या उपाययोजना करीत असतात़ त्यामुळे दुर्मीळ व संवेदशील प्राणी, पक्षी यांचा बळी जातो़वास्तविक पाहता पिकांचे नुकसान वन्यप्राण्यांकडून झाल्यास बाधित शेतकºयांना पंचनामे करून शासनाकडून भरपाई देण्यात येते़ परंतु अविचारी शेतकºयांमुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका पोहोचत आहे़ त्यामुळे दुर्मीळ वन्यप्राण्याचा नाहक बळी जाताना वारंवार दिसत आहे़ त्या अनुषंगाने वाई तालुक्यातील पर्यावरणपे्रमींनी मोरांच्या मृत्यूला कारणीभूत असणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे़कडक कारवाईची मागणीवाई तालुक्यात वन्यप्राण्यांचे जीव घेण्याच्या वांरवार घटना घडत असून, अनेक दुर्मीळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़ यांचे गांभीर्य काही समाजकंटकांना नसल्याने राजरोसपणे प्राण्यांचे जीव घेत आहे़ त्यांना काययाचा धाक उरलेला नाही. ही गंभीर बाब असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वृक्षसंवर्धन परिवारचे सदस्य प्रशांत डोंगरे यांनी केली आहे.
या दिवसात पाणी, अन्नाच्या शोधात वन्य प्राणी शेतीक्षेत्रात येतात़ पिकांचे नुकसान झाले तरी पंचनामा करून भरपाई मिळू शकते़ परंतु एखाद्याने चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याने वन्य प्राण्याच्या जीवाला धोका पोहोचतो. त्यांचा बळी गेल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल.- महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल वाई