यावेळी गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी, रमेश रावळ, सूरज गांधी, विवेक कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
धीरज गांधी म्हणाले, गांधी फाऊंडेशनमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याची जाणीव ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. अथवा शिक्षण घेण्यात अडथळे येतात. हे ओळखून गांधी फाऊंडेशनकडून छोटासा प्रयत्न म्हणून गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.
प्रारंभी प्रतिमापूजन व प्रार्थना झाल्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. ए. मुल्ला यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर धीरज गांधी व रमेश रावळ यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे सहशिक्षक सवाखंडे यांनी विद्यालयाची माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. (वा. प्र.)
फोटो : १३केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडच्या संत तुकाराम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गांधी फाऊंडेशनतर्फे धीरज गांधी यांच्याहस्ते गणवेश वितरण करण्यात आले.