कऱ्हाड : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील ‘ब’ सत्ता प्रकार रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
कोपर्डे हवेली येथे मिळकतीवरील ‘ब’ सत्ता प्रकार रद्द होण्याबाबत मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशावरून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधित अधिकारी व ग्रामस्थांसोबत बैठक आयोजित करून त्यामध्ये या प्रकाराची संपूर्ण माहिती संबंधितांकडून घेतली. हा प्रकार रद्द करण्याबाबत सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, निवासी जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी अनिल लोखंडे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका भूमी अभिलेख अधिकारी बी. एस. भोसले, मंडल अधिकारी विनायक पाटील, तलाठी एस. ए. सावंत, रामचंद्र रघुनाथ चव्हाण, नेताजी चव्हाण, उत्तम चव्हाण, रामचंद्र चव्हाण, पोपट चव्हाण, प्रताप चव्हाण, प्रदीप साळवे, प्रवीण साळवे उपस्थित होते.
फोटो : २२केआरडी०१
कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील ब सत्ता प्रकाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.