‘जैसी करनी... वैसी भरनी’; शिवेंद्रसिंहराजेंना सूट नाही -: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:38 PM2019-06-18T23:38:13+5:302019-06-18T23:38:56+5:30

‘जैसी करनी वैसी भरनी, या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही, आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी सुद्धा याला ते अपवाद नाहीत, लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केल्याने आमच्या

'Do not do ... just fill that'; Shivendra Singh does not discount - - Udayanraje Bhosale | ‘जैसी करनी... वैसी भरनी’; शिवेंद्रसिंहराजेंना सूट नाही -: उदयनराजे भोसले

‘जैसी करनी... वैसी भरनी’; शिवेंद्रसिंहराजेंना सूट नाही -: उदयनराजे भोसले

googlenewsNext
ठळक मुद्देरामराजेच संभ्रम निर्माण करत असल्याची टीका

सातारा : ‘जैसी करनी वैसी भरनी, या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही, आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी सुद्धा याला ते अपवाद नाहीत, लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केल्याने आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही,’ असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.

उदयनराजेंनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना सर्वत्र दगाबाजी, दगा-फटका, धोका याचेच चित्रण डोळ्यांसमोर येत आहे, असा दाट संशय त्यांच्या एकंदरीत विधानावरून येतो. शिवेंद्रराजेंनी लोकसभा निवडणुकीच्या आधीची वक्तव्ये एकदा तपासावीत. ‘पवारसाहेबांनी आमदारांना विश्वासात घ्यावे, पवारसाहेब देतील तो उमेदवार मान्य असेल, पवारसाहेबांनी तिकीट दिले तरी उदयनराजेंचे काम करणार नाही, लोकसभेला उदयनराजेंचे कामच करणार, कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत,’ वगैरे तुमचे उद्गार तुम्ही विसरलेला नसणार किंवा तुम्ही मिशीवाल्यासोबत खाल्लेल्या चविष्ट मिसळीचा काही दिवसांनंतर आता तुम्हाला ठसका लागत असावा म्हणूनच कदाचित आता आमच्या प्रत्येक हालचालीविषयी तुम्हाला शंका उत्पन्न होत असावी.

जावळीत तुम्हीच उभी केलेली भूतं तुमच्या मानगुटीवर बसायला कमी करणार नाहीत, याची नोंद गांभीर्याने घ्या. तुमचा निशाणा, तुमच्याच करणीने निर्माण केलेल्या बागुलबुवांवर ठेवा, तुम्ही जे केले आहे तेच तुम्हाला दसपटीने परत मिळणार आहे, याची खूणगाठ पक्की बांधून त्यादृष्टीने वाटचाल करा. आपण सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातून मनोमिलनानंतर महाराष्ट्रातून दोन नंबरने निवडून आला होता. एक नंबरला अशोक चव्हाण आणि तीन नंबरला अजित पवार हे होते. इतके लीड दिवंगत भाऊसाहेब महाराजांच्यापासून कोणालाही मिळालेले नाही, हे विसरलात का?

लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही जाहीर सभेत आपणासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सहकार्य केल्याचे नमूद केले आहे. काही दिवसांनी कथित भगीरथ ऊर्फ भोगीरथ मात्र उदयनराजेंना जावळीत कमी मते मिळाली ते पाहा, असा आगंतुक सल्ला देतात, आपण तर म्हणता की सातारा-जावळीमध्ये मिळालेले मताधिक्य तुम्ही पक्षाशी प्रामाणिक राहून काम केल्याने मिळाले आहे, यावरून तुमच्या बाबतीत संभम्र कोण निर्माण करतंय, हे एकदा विचार करून ठरवा. ‘जैसी करनी वैसी भरनी,’ हा न्याय सर्वांनाच लागू आहे, असेही खा. उदयनराजे यांनी नमूद केले आहे.

तिघे मिळून डिस्टर्ब करत असल्याची तक्रार
आमदार शिवेंद्रराजे यांनी आमदार शशिकांत शिंदे, ॠषीकांत शिंदे आणि उदयनराजे असे तिघे मिळून डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार केली आहे. तसा उपद्रव करण्याचे नियोजन करण्यासाठी आमची कसली बैठक, मिटिंग, कोठे झाली आहे का? याचा खुलासा आमदार शशिकांत शिंदे यांनी करणे गरजेचे आहे, तसेच आमदार शिवेंद्रराजे यांनीही आमदार शशिकांत शिंदे यांना याबाबत विचारणा केली पाहिजे, असे मतही उदयनराजेंनी मांडले आहे.

Web Title: 'Do not do ... just fill that'; Shivendra Singh does not discount - - Udayanraje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.