वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले -बळीराजाचे डोळे आभाळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:53 AM2019-02-15T00:53:47+5:302019-02-15T00:54:08+5:30
गेले काही दिवस वातावरणात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानाचा द्र्राक्ष बागांवर प्रतिकुल परिणाम होत आहे.
पिंपोडे बुद्रुक : गेले काही दिवस वातावरणात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानाचा द्र्राक्ष बागांवर प्रतिकुल परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेले काही दिवसांपासून परिसरातील वातावरणात कडाक्याची थंडी कायम असताना दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे वाघोली, सर्कलवाडी, चौधरवाडी, सोनके येथील द्राक्ष बागांवर झाला आहे. परिसरातील द्राक्षे पीक फळ वाढीच्या आवस्थेत असून थंडीमुळे फळाच्या आकारात अपेक्षित वाढ झाली नाही. त्यासाठी शेतकºयांनी विविध प्रयत्न करत त्या परिस्थितीवर मात केली. परंतु अलीकडील दोन दिवसांपासूनच्या ढगाळ हवामानामुळे पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. पाणीटंचाई काळात द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी पाण्यावर पैसे खर्च करून द्राक्षे पीक जोपासले आहे. यावर्षी फळ धारणाही चांगली असताना वातावरणात निर्माण होणारी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीत द्राक्ष पीक रोगाला लवकर बळी पडत असल्याने मुळात द्राक्ष पिकाचा उत्पादन खर्च जास्त असतो. यावर्षी पाणीटंचाई मुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असतानाच नवे संकट उभे राहिले आहे.
- राहुल धुमाळ संचालक, विकास सेवा सोसायटी.