भाजपाच्या आणखी एका नेत्याचा प्रताप; सभागृहात राष्ट्रगीत सुरु असताना केली शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 08:02 PM2018-03-24T20:02:07+5:302018-03-24T20:22:46+5:30

राष्ट्रगीताला प्रारंभ होताच पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक उभे राहिले. मात्र, भाजपचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

During the national anthem in the House, the sub-division of the BJP suburbs | भाजपाच्या आणखी एका नेत्याचा प्रताप; सभागृहात राष्ट्रगीत सुरु असताना केली शिवीगाळ

भाजपाच्या आणखी एका नेत्याचा प्रताप; सभागृहात राष्ट्रगीत सुरु असताना केली शिवीगाळ

googlenewsNext

लोणंद (सातारा) : नगरपंचायतीच्या सभेत राष्ट्रगीत सुरू असताना सर्व पदाधिकाऱ्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रताप भाजपच्या उपनगराध्यक्षांनी घडविला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात मासिक सभा बुधवार, दि. २१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक विषयांवरून वादळी चर्चा सुरू झाली. आपण दाखल केलेल्या ठरावांचे वाचन होत नाही, असा आरोप करत उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी मुख्याधिकारी अभिजित परदेशी यांना धारेवर धरले. दरम्यान, सभा संपल्याचे जाहीर करत नगराध्यक्षा स्नेहलता शेळके यांनी राष्ट्रगीत सुरू करण्याची सूचना केली. 

राष्ट्रगीताला प्रारंभ होताच पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक उभे राहिले. मात्र, भाजपचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिला नगराध्यक्षा शेळके अन् मुख्याधिकारी परदेशी यांच्यासह सभागृहाला शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी त्यांचे सहकारी टेबलही वाजवत होते. मात्र, राष्ट्रगीत सुरू असल्याने सर्वजण मान खाली घालून शांतपणे उभे होते. 
दरम्यान, सभागृहाच्या कामकाजाचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्यात हे दृश्य चित्रबद्ध झाले.

ही चित्रफीत आता बाहेर पडली असून, या शिवीगाळीवरून सोशल मीडियावर अत्यंत संतापाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लोणंद नगरपंचायतीत सतरांपैकी राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक होते. भाजपच्या दोन नगरसेवकांना सोबत घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी सत्ता स्थापन केली. मात्र, स्थानिक नेते आनंदराव शेळके-पाटील यांनी आपल्या तीन नगरसेवकांना घेऊन काँग्रेससोबत पंचायतीचा कारभार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचा उपनगराध्यक्ष असूनही भाजपला सत्तेत स्थान मिळत नाही याचा राग उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी काढला असला तरी राष्ट्रगीत सुरू असताना एका महिला नगराध्यक्षाला अश्लील शिवीगाळ करावी काय, असा सवाल लोणंदकरांमधून विचारला जात आहे. 

Web Title: During the national anthem in the House, the sub-division of the BJP suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.