शिक्षण हेच जीवन जगण्याचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:02+5:302021-01-18T04:35:02+5:30

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ...

Education is the means to an end | शिक्षण हेच जीवन जगण्याचे साधन

शिक्षण हेच जीवन जगण्याचे साधन

googlenewsNext

येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे अध्यक्षस्थानी होते. बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्या. सरोदे म्हणाले, युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंद ओळखले जातात. तर राजमाता जिजाऊ या खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या जीवनाचा आदर्श आहेत. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या उभारणीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. आणि त्यांनी ते पूर्ण केले. स्वामी विवेकानंद यांचे जीवन म्हणजे युवकांना जगण्याचा संदेश आहे. देशाच्या संस्कृतीची पताका आपल्या विचारांतून त्यांनी जगभर पसरवली.

प्राचार्य डॉ. सतीश घाटगे म्हणाले, राजमाता जिजाऊंनी रचलेल्या पायावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे राहिले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अंगार भरला. आणि अन्याय-अत्याचार यापासून रयतेची सुटका केली. स्वामी विवेकानंद म्हणजे एक ज्ञानतपस्वी होत. त्यांच्या ज्ञान तेजाने संपूर्ण विश्व अवाक् झाले. या आदर्शांना समोर ठेवूनच आपल्या राष्ट्राची सेवा सर्वांनी करावी.

संस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुरेश यादव यांनी आभार मानले. उपप्राचार्य मोहन पाटील, पर्यवेक्षक पिलोबा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Education is the means to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.