खंडाळा : ‘दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेले उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून, कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी गावकऱ्यांनी केलेले प्रयत्न व घेतलेली दक्षता अतिशय स्तुत्य आहे. यापुढेही अशीच दक्षता घेऊन शासनाने राबविलेल्या धोरणाची प्रत्येकाने काटेकोर अंमलबजावणी करून जग, देश, राज्य व जिल्ह्यावरील संकट दूर व्हावे, यासाठी प्रयत्न करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
पळशी (ता. खंडाळा) येथे माजी सभापती दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, दत्त पीठाचे मठाधिपती नारायण महाराज, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या स्वप्नातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी गाव सतत प्रयत्नशील असते. पळशी येथे बिनविरोध निवडणुकांची परंपरा अतिशय चांगली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सुद्धा चांगले प्रयत्न करीत आहेत.’
मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ‘पळशीतील ग्रामस्थ शासनाच्या विविध धोरणास हातभार लावत असून, भाऊंनी दिलेली शिकवण, गावाची एकजूट, ४५ वर्षांवरील लोकांचे शंभर टक्के केलेले लसीकरण आदी बाबी कौतुकास्पद आहेत. भाऊंच्या पश्चात त्यांचा वारसा जपत या गावात व परिसरात केलेले सामाजिक काम अतिशय उल्लेखनीय आहे. ’
यावेळी सरपंच हेमाताई गायकवाड, उपसरपंच एकनाथराव भरगुडे, सदस्य गजानन भरगुडे, कविता राऊत, सुजित दगडे, नूतन चव्हाण, नवनाथ भरगुडे, कमल भोसले, माधुरी गोळे, ग्रामसेवक नंदकुमार यादव, आशितोष भरगुडे-पाटील, अमोल पाटील, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, पाणलोट समितीचे अध्यक्ष राजेंद्र भरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
२५खंडाळा