सातारा : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील कोरोना लसीकरण थांबविण्यात आले असले तरी आजही साडेअकरा हजार कोरोना योद्द्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे; तर लस उपलब्ध होत नसल्याने मोहिमेला वेग कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ७५ हजारांवर नागरिकांनाच लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसºया टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. तर एक मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येऊ लागली. पण, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने ही मोहीम थांबवली आहे. फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लसीकरण सुरू आहे.
जिल्ह्यात ४४० हून केंद्रांत लसीकरण सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यातच लस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेक वेळा लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागतात.
चौकट :
किती लसीकरण?
कोरोना योद्धे
पहिला डोस ३०५६१
दुसरा डोस १८९५८
.........
फ्रंटलाईन वर्कर
पहिला डोस ४०९७२
दुसरा डोस २०६०३
.............
१८ ते ४४ वयोगट
पहिला डोस १६३४८
दुसरा डोस ०००
..................
४५ ते ६० वयोगट
पहिला डोस २३३०८१
दुसरा डोस २५१७१
.........................
६० वर्षांवरील
पहिला डोस २४५४२२
दुसरा डोस ४४१४०
..........................
जिल्ह्याला मिळालेले डोस...
- जिल्ह्याला जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ६ लाख ८९ हजार ७६० कोरोना लसीचे डोस मिळाले आहेत. त्यांमधील सहा लाख ७५ हजार ४४८ लोकांना डोस देण्यात आलेला आहे.
- कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांत द्यावा लागत आहे; तर कोवॅक्सिनचा ३० दिवसांनंतर देण्यात येतो.
- जिल्ह्याला लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्यास दिवसाला एक लाख लोकांना डोस देण्याची क्षमता यंत्रणेत आहे. आतापर्यंत दिवसाला ३७ हजार लोकांना लस देण्याचा उच्चांक आहे.
....................................................................