जिल्हा न्यायालयातून घरफोडीतील आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:42+5:302021-06-23T04:25:42+5:30

सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून घरफोडीतील आरोपीने पलायन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सूरज राजू माने असे ...

Escape of burglary accused from district court | जिल्हा न्यायालयातून घरफोडीतील आरोपीचे पलायन

जिल्हा न्यायालयातून घरफोडीतील आरोपीचे पलायन

Next

सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून घरफोडीतील आरोपीने पलायन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सूरज राजू माने असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विजय हणमंत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. २१ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी सूरज राजू माने (रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा) याला सत्र न्यायालयात रिमांडसाठी नेले होते. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याची सुनावणी झाली आणि त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याला सातारा कारागृहात ठेवण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर विजय गायकवाड हे वॉरंट घेण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी सूरज माने याने गायकवाड यांच्या हाताला हिसका दिला आणि तो पळून गेला. याप्रकरणी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास महिला पोलीस नाईक झेंडे या तपास करत आहेत.

दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूरज माने याला घरफोडी प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडून घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आला होता.

Web Title: Escape of burglary accused from district court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.