बामणोली : दुर्गम बामणोली विभागातील ३८ गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावांतील लोकांनी एकत्र येत सह्याद्री कोयना संघर्ष समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून विभागातील महत्त्वाचा प्रश्न असलेला कास-माचूतर रस्ता (राजमार्ग) खुला करण्याबरोबरच सातारा-बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू ठेवणे व पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
सह्याद्रीनगर येथे कोरोना नियमांचे पालन करून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत समिती स्थापन करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. या वेळी बामणोलीचे माजी सरपंच राजेंद्र संकपाळ, अंधारीचे उपसरपंच रवींद्र शेलार, कास संयुक्त व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विष्णू किर्दत,
घाटाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू काळे, दत्ता किर्दत, संतोष मालुसरे, दत्ता शिंदे, तुकाराम शिंदे, आपटीचे सरपंच बाबूराव शिंदे, गणेश गोरे, चंद्रकांत शिंदे, फळणीचे संतोष साळुंखे, लक्ष्मण शिंदे, गणपत ढेबे, पांडुरंग शिंदे, संदीप पाटणे यांच्यासह दोन्ही भागातील लोक उपस्थित होते.
रवींद्र शेलार म्हणाले, ‘कास पठार ते सह्याद्रीनगर हा राजमार्ग तीन वर्षांपासून बंद केला आहे. नेमका कोणत्या कारणास्तव हा रस्ता बंद केला हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. हा मार्ग खुला झाल्यास संपूर्ण जावली तालुक्याचा पर्यटन विकास होऊन लोकांना रोजगार उपलब्ध होईल.’
राजेंद्र संकपाळ यांनी सातारा-बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू करून डांबरीकरण करण्यात यावे. यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
कास समितीचे अध्यक्ष विष्णू किर्दत यांनी कास गाव संघर्ष समितीला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
सभेचे प्रास्ताविक तुकाराम शिंदे यांनी केले. आभार संतोष मालुसरे यांनी मानले.
फोटो आहे...
....................................................................................................................