वाजण्यापूर्वीच डीजेचा गळा आवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:57 PM2018-09-18T23:57:14+5:302018-09-18T23:57:18+5:30
खंडाळा : गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण करणारी यंत्रणा वापरण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे मंगळवारी दोन डीजे जप्त करण्यात आले. ही यंत्रणा पोलिसांनी सील केली आहे.
गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण
होऊ नये, यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत. यानुसार खंडाळा पोलिसांनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अहिरे गावातील नंदकुमार शिवाजी अहिरे यांच्या मालकीची ध्वनिक्षेपक यंत्रणेसह वाहन (एमएच ०४ एजी ४३३९)
जप्त करण्यात आले. तसेच रमेश दत्तू पवार (रा. अहिरे) यांच्या मालकीचे वाहन
(एमएच १२ आरए ६९१) हे वाहन
ध्वनिक्षेपक यंत्रणेसह जप्त करून सील केले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत असणारी सर्व ध्वनिक्षेपक यंत्रे गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत दोन्ही व्यावसायिकांना जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची माहिती देण्यात आली असून, त्यामुळे ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खंडाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार विजय पिसाळ, नितीन नलवडे, गिरीश भोईटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.