सेविका, मदतनिसांचे कार्य उत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:12 AM2021-02-18T05:12:22+5:302021-02-18T05:12:22+5:30
पाटण येथे रोटरी क्लब कोयना विभागातील १०५ अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत ...
पाटण येथे रोटरी क्लब कोयना विभागातील १०५ अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव जगदीश शेंडे, सदस्या अपर्णा शेंडे, पर्यवेक्षिका सुरेखा सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्यवेक्षिका सुरेखा सुतार म्हणाल्या, कोरोना या जागतिक महामारीच्या कालावधीत बेचिराख होणारा कोयना विभाग वाचविण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांनी अवितरपणे निष्ठेने समाजसेवेचा वसा घेऊन काम केले. त्यामुळे कोयना विभाग कोरोनामुक्त झाला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेले काम गौरवास्पद आहे.
यावेळी अंगणवाडीच्या १०५ सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. सुनीता शेलार यांनी स्वागत केले. रंजना लाड यांनी आभार मानले.
फोटो : १७केआरडी०२
कॅप्शन : पाटण येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रदीप सागवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.