पन्नास वर्षांतील मस्तीची व्याजासह फेड करणार -अतुल भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 11:18 PM2019-10-03T23:18:01+5:302019-10-03T23:57:11+5:30

मदनराव मोहिते म्हणाले, ‘मागील विधानसभा निवडणुकीत नशिबाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार झाले. ४० वर्षे जे बरोबर होते अशा आनंदराव पाटलांनाही त्यांनी आता अंतर दिले आहे.

Fifty years of fun will pay off with interest | पन्नास वर्षांतील मस्तीची व्याजासह फेड करणार -अतुल भोसले

कºहाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काढलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Next
ठळक मुद्देजनतेला आता पर्यटन करणारा आमदार नकोय क-हाडला भाजपच्या प्रचारसभेत इशारा

 क-हाड : ‘क-हाड दक्षिणेतील जनतेला आता पर्यटन करणारा आमदार नको आहे. तर बदल घडविणार हवा आहे. जे लोक आमची अवहेलना करतात, जे प्रत्यक्ष पंढरपूरच्या पांडुरंगाच्या अबिराविषयी बोलतात. त्यांची पन्नास वर्षांतील मस्ती ही त्यांना या निवडणुकीत व्याजासह परतफेड करणार आहे,’ असा खणखणीत इशारा कºहाड दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी दिला.

क-हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमधून डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने गुरुवारी दाखल केला. यानंतर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, विनायक भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सुहास जगताप, विद्या पावसकर, अशोकराव थोरात, शिवसेनेचे उपनेते जयवंतराव शेलार, सुनील पाटील, प्रताप पाटील, शिवाजी जाधव, भीमराव पाटील, कविता कचरे, सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मदनराव मोहिते म्हणाले, ‘मागील विधानसभा निवडणुकीत नशिबाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार झाले. ४० वर्षे जे बरोबर होते अशा आनंदराव पाटलांनाही त्यांनी आता अंतर दिले आहे. काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था ही सध्या आम्हाला कोणी जिल्हाध्यक्ष देता का हो, जिल्हाध्यक्ष, अशी झालेली आहे.’

पालिकेला रुपयांचाही निधी दिला नाही...
क-हाड शहरात काही दिवसांपासून विकासकामांचे बोर्ड झळकत असलेले पाहायला मिळाले. त्यावर पूर्वीच्या कामांचा उल्लेख करून क-हाडची ओळख म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव लिहिले होते. मात्र, क-हाडची खरी ओळख ही पृथ्वीराज चव्हाण नसून यशवंतराव चव्हाण व पी. डी. पाटील हे आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी पाच वर्षांत पालिकेला एक रुपयाचा निधीही दिला नसल्याचा आरोप उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी केला.

माजी आमदार करण्याची वेळ
पृथ्वीराज चव्हाणांनी पाच वर्षांत काय केले? आता या निवडणुकीच्या निमित्ताने एक संधी व वेळ आली आहे ती म्हणजे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना माजी आमदार करण्याची, अशी टीका डॉ. सुरेश भोसले यांनी केली.

स्मशानभूमी बांधणारे जुने आमदार...
माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यावर टीका करताना मदनराव मोहिते म्हणाले, ‘आमच्याकडे एक जुने आमदार आहेत. ते केवळ स्मशानभूमी व सांस्कृतिक समाजमंदिरे बांधण्यात पटाईत आहेत. ते रयत संघटनेच्या माध्यमातून आपल्या पुत्राला निवडणुकीच्या रिंंगणात उतरविणार आहेत.’
 

Web Title: Fifty years of fun will pay off with interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.