आग डेपोत.. धूर सातारा शहरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:54 AM2020-04-24T11:54:16+5:302020-04-24T11:54:31+5:30
सातारा पालिकेचा सोनगावनजीक कचरा डेपो आहे. शहरासह उपनरातील कचरा याठिकाणी संकलित केला जातो. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की डेपोतील कचरा पेटण्याच्या घटना सुरू होतात. बुधवारी दुपारी कचºयाखाली तयार झालेल्या मिथेन वायूने पेट घेतल्याने डेपोत आग लागली.
सातारा : पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत लागलेली आग गुरुवारी दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. आगीची तीव्रता वाढल्याने शहराच्या पश्चिम भागात गुरुवारी सकाळी धुराचे लोट पसरले होते. या धुरामुळे बोगदा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आरोग्य विभागाचे अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.
सातारा पालिकेचा सोनगावनजीक कचरा डेपो आहे. शहरासह उपनरातील कचरा याठिकाणी संकलित केला जातो. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की डेपोतील कचरा पेटण्याच्या घटना सुरू होतात. बुधवारी दुपारी कचºयाखाली तयार झालेल्या मिथेन वायूने पेट घेतल्याने डेपोत आग लागली. आरोग्य व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे काम हाती घेतले; परंतु आग आटोक्यात आली नाही.
बुधवारी रात्री संपूर्ण शहरावर धूरच धूर दिसत होता. गुरुवारी सकाळीही शहराच्या पश्चिम भागातील बोगदा, धस कॉलनी, रामाचा गोट, मंगळवार पेठ, समर्थ मंदिर चौक परिसरावर धुराचे साम्राज्य पसरले होते. सकाळचे वातावरण धुरकट झाल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. हवेमुळे आगीची तीव्रता वाढली. ती नियंत्रणात आणताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कचरा डेपोतील आगीचा त्रास आजवर केवळ सोनगाव, जकातवाडी, शेंद्रे या गावांना होत होता. आता प्रथमच सातारा शहराला याचा अनुभव आला.
चार टीपर, दोन जेसीबी व पंचवीस कर्मचारी आग विझविण्याचे काम करीत आहेत. बुधवारी दुपारनंतर व गुरुवारी दिवसभर अग्निशमनच्या शंभरहून अधिक फेºया झाल्या. मात्र, आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवता आले नाही. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे घटनास्थळी दिवसभर तळ ठोकून होते.