जंबो सेंटरजवळील मारहाणप्रकरणी पाचजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:43+5:302021-05-14T04:39:43+5:30
सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील जंबो कोरोना सेंटरसमोर दोघा तरुणांना मारहाण करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसास जखमी केल्याप्रकरणी पाचजणांवर ...
सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील जंबो कोरोना सेंटरसमोर दोघा तरुणांना मारहाण करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसास जखमी केल्याप्रकरणी पाचजणांवर गर्दी, मारामारीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी मनोज मिठापुरे, अनिल मिठापुरे, विक्रम मिठापुरे, किरण मिठापुरे आणि अजय मिठापुरे (सर्व रा. मोळाचा ओढा, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार सुमित्रा डवरे यांनी फिर्याद दिली आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास जंबो कोरोना सेंटर प्रवेशद्वाराजवळ काहीजण दोघा तरुणांना मारहाण करत होते. यावेळी हवालदार सुमित्रा डवरे या तेथे गेल्या. यावेळी एकाला मारहाण करीत असलेल्यांना त्यांनी विचारणा केली. यावेळी तो कोरोनाबाधित आहे; परंतु, चाचणीला नकार देत आहे म्हणून पकडून नेत असल्याचे मारहाणकर्त्यांनी सांगितले. त्यावेळी संबंधित तरुण मॅडम मला हे मारत आहेत, असे सांगत होता. त्याचवेळी तेथे जवळच दुसऱ्या तरुणाला मारहाण करण्यात येत होती. दरम्यान, यावेळच्या मारहाणीत डवरे यांच्या हाताला मार बसला.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पतंगे तपास करीत आहेत.
.............