सातारा : भाड्याने नेलेल्या सेंट्रिंगच्या २९९ प्लेट परत न देता सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी दीपक विठ्ठल भिसे (रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा. मूळ रा. किन्हई, ता. कोरेगाव) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर संजय श्रावण सूर्यवंशी (रा. चिमणपुरा पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. संजय सूर्यवंशी यांनी दीपक भिसे यांच्याकडून ३४८ सेंट्रींग प्लेट भाड्याने नेल्या होत्या. त्यातील ४९ प्लेट परत केल्या. राहिलेल्या २९९ प्लेटांची भिसे यांनी सूर्यवंशींकडे अनेकदा घरी जाऊन तसेच फोनवरून मागणी केली. त्या वेळी सूर्यवंशींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे भिसे यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. आहे. याप्रकरणी हवालदार भिसे हे तपास करत आहेत.
..........\\\\\\\\\\\\