रुबीतर्फे गुरुवारी मोफत हृदय तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:04+5:302021-04-08T04:40:04+5:30
सातारा : हृदय रुग्णांसाठी मोफत हृदय तपासणी शिबिर रुबी मेडिकल सर्व्हिसेस, सातारा येथे आयोजित केले असून, परिसरातील सर्व हृदयविकार ...
सातारा : हृदय रुग्णांसाठी मोफत हृदय तपासणी शिबिर रुबी मेडिकल सर्व्हिसेस, सातारा येथे आयोजित केले असून, परिसरातील सर्व हृदयविकार रुग्णांनी या अमूल्य संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
छातीमध्ये दुखणे, घाम येणे, चक्कर येणे, डाव्या हातातून मुंग्या येणे, धाप लागणे, गुदमरणे, साखरेचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, या शिबिरामध्ये हृदयविकारतज्ज्ञांचा मोफत सल्लाही मिळणार आहे.
३ स्टेला एमआरआय, सिटी स्कॅन, ॲन्जिओग्राफी, ॲन्जिप्लास्टी, बायपास आदी व अशाच कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवा आपल्या सोयीप्रमाणे उपलब्ध आहेत.
आम्ही आयोजित केलेली अशा प्रकारची शिबिरे सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, कऱ्हाड, सोलापूर व इतर अनेक ठिकाणी राबविण्यात आली आहेत. त्याचा हजारो लोकांना फायदा झालेला आहे. मॅनेजिंग ट्रस्टी आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पी. जी. ग्रँड यांचे सहकारी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित खडतरे दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी म्हणजे दि. ८ एप्रिल रोजी रुबी मेडिकल सर्व्हिसेस, डॉ. पारंगे हॉस्पिटल चौक, एसटी स्टॅण्डच्या पाठीमागे सातारा येथे सकाळी ९ ते १२ आणि कऱ्हाड येथे १ ते ३ या वेळेत आयोजित केले आहे. सर्व रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात येते की, आमच्या ७०३०९३६९४६ व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही वेळ घेऊ शकता. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी मेडिकल सर्व्हिसेसच्या व्यवस्थापनाने केले आहे. (वा.प्र.)