साताऱ्यात खुणावताहेत फळांच्या भिंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:35 AM2021-03-15T04:35:18+5:302021-03-15T04:35:18+5:30
जावेद खान लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कडक ऊन्हामुळे जीव कासावीत होत असताना फळं खाली ...
जावेद खान
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कडक ऊन्हामुळे जीव कासावीत होत असताना फळं खाली तर शरीर कसं प्रफुल्लित होतं. गारेगार अन् लालेलाल कलिंगड खाल्यानं पोट कसं गार होतं. शहाळंतील पाणी तर आजारी माणसाला पण तेजला देऊन जातं तसेच अननसाच्या रसामुळे काम करण्याची ऊर्जा मिळते. ही फळे साताऱ्यात दाखल झाली असून ठिकठिकाणी भिंतीसारखी रचली आहेत.
१. साताऱ्यात कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून उन्हाळी फळ म्हणून या फळाकडे पाहिले जाते. उष्णतेत लाहीलाही झाल्यानंतर कलिंगडचा गारवा मिळत असल्याने सध्या कलिंगडला मागणी वाढली आहे.
२. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्याने अशक्यपणा येतो. त्यामुळे डाॅक्टरही शहाळं पिण्याचा सल्ला देतात. हे शहाळे साताऱ्यातील विविध दवाखाना परिसरात विक्रीसाठी आले आहेत. त्यांना मोठी मागणी आहे.
३. कर्नाटकहून राजाराणी जातीच्या अननसाची साताऱ्यात आवक झाली आहे. मागणी जास्त असल्याने सध्या अननस आकारानुसार पन्नास ते शंभर रुपये दराने विक्री केली जात आहे. त्यांना चांगली मागणी आहे.