जिल्ह्यातील २९ गावांना चौदा कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:32+5:302021-07-08T04:25:32+5:30

कऱ्हाड : जलजीवन मिशन अंतर्गत २९ गावांना नळपाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल १४ कोटी २३ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला ...

Fund of Rs. 14 crore to 29 villages in the district | जिल्ह्यातील २९ गावांना चौदा कोटींचा निधी

जिल्ह्यातील २९ गावांना चौदा कोटींचा निधी

Next

कऱ्हाड : जलजीवन मिशन अंतर्गत २९ गावांना नळपाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल १४ कोटी २३ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून या गावांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, त्यांच्या शिफारशीने आणखी १४८ गावांचे प्रस्ताव आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत सातारा तालुक्यातील बोरगाव गावासाठी १ कोटी १५ लाख, निसराळे ४५ लाख, रामकृष्णनगर २५ लाख, जैतापूर २५ लाख, जांभगाव २१ लाख ५१ हजार, कौंदनी नरेवाडी १५ लाख, निगडी १२ लाख ३२ हजार, गजवडी १५ लाख ४५ हजार, कोरेगाव तालुक्यातील भीमनगर २८ लाख १६ हजार, खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी ४१ लाख ६४ हजार, महाबळेश्वर तालुक्यातील कुमठे २३ लाख ३३ हजार, वाई तालुक्यातील लगडवाडी १२ लाख, कऱ्हाड तालुक्यातील घोगाव ९५ लाख ४६ हजार, बेलदरे ९ लाख ४५ हजार, मालखेड ७९ लाख ५० हजार, वनवासमाची ७० लाख, साकुर्डी ६८ लाख, वराडे ६१ लाख २४ हजार, विठ्ठलवाडी ४२ लाख, साळशिरंबे ३७ लाख ४४ हजार, तुळसण २६ लाख, वडोली निळेश्वर २४ लाख ५ हजार, महारूगडेवाडी २३ लाख ६१ हजार, यादववाडी १३ लाख ८७ हजार, पाटण तालुक्यातील नुने ७८ लाख, मानेगाव ६० लाख ५६ हजार, म्हावशी ३ कोटी, जिंती २९ लाख ४७ हजार, कराटे २५ लाख ४१ हजार रुपये असे २९ गावांसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे १४ कोटी २३ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता दिली असून, ही कामे लवकरच सुरु होणार आहेत.

तसेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीने जल जीवन मिशन अंतर्गत आणखी १४८ गावे प्रस्तावित असून ती आराखड्यात समाविष्ट झालेली आहेत. त्यामध्ये पाटण, कऱ्हाड, खंडाळा, सातारा, वाई तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.

- कोट.

जलजीवन मिशननुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ सालापर्यंत ‘हर घर नल से जल’ याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यास केंद्र शासन कटिबद्ध असून, राज्य शासनाच्या सहकार्याने ही योजना राबवली जात आहे. त्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातील कामे कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होतो.

- श्रीनिवास पाटील, खासदार

Web Title: Fund of Rs. 14 crore to 29 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.