गमेवाडीचा यंत्रमाग कारखाना डबघाईला

By admin | Published: September 3, 2014 08:39 PM2014-09-03T20:39:58+5:302014-09-04T00:08:23+5:30

कच्च्या मालाचा अभाव : महामंडळाचे अधिकारी तुपाशी तर कामगार मरतोय उपाशी

Gamewadi looming factory buried | गमेवाडीचा यंत्रमाग कारखाना डबघाईला

गमेवाडीचा यंत्रमाग कारखाना डबघाईला

Next

चाफळ : राज्य यंत्रमाग महामंडळाने दतक घेतलेल्या पाटण तालुक्यातील गमेवाडी (चाफळ) ता.पाटण येथील यंत्रमाग प्रकल्प स्थानिक प्रशासन व यंत्रमाग महामंडळ यांच्या गलथान कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे येथील स्थानिक कामगार बेरोजगार बनुन त्यांच्यावर उपासमारच्ीीाी वेळ येऊ न ठेपली आहे. एकंदरीत महामंडळाचे अधिकारी तुपाशी व कामगार उपाशी अशी चर्चा परिसरात सुरु आहे.
तीथक्षेत्र चाफळ परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळून सर्वांना रोजगार मिळावा, या हेतूने १९७२ मध्ये मुंबईचे उद्योगपती अरविंंद शेठ मफतलाल यांनी गमेवाडीच्या ओसाड माळरानावर ४८० यंत्रमागांचा प्रकल्प सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली असतानाच तत्कालीन राजकर्त्यांनी या प्रकल्पाचे तुकडे करुन चाफळ, कुठरे, कोळेवाडी, नांदगाव व कुंडल याठिकाणी प्रत्येकी ९६ यंत्रमाग असे स्वतंत्र पाच प्रकल्प सुरु
केले.
गमेवाडी (चाफळ), ता. पाटण येथील प्रकल्पामध्ये प्रत्येकी ४८ मागांच्या दोन स्थानिक सहकारी सोसायट्या स्थापन करुन त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य नेमून या प्रकल्पाचा सर्व कारभार सोसायट्यांच्या माध्यमातून व राज्ययंत्रमाग महामंडळ यांच्या आर्थिक सहकार्यातून सुरु होता. पण सध्या या सोसायट्यांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही. किंवा या यंत्रमाग प्रकल्पासाठी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळेच भरपूर निधी मिळूनही या प्रकल्पांचे आंधळं दळतंय अन् कुत्रं पीट खातंय अशी अवस्था झाली आहे.
अविकसित भागाचा विकास हा केंद्रबिंंदू मानून उघोगधंद्याचे विकेंद्रिकरण करण्याकडे शासन भर देत असताना मात्र महामंडळाला कापड पुरवठा करण्याकरिता आरक्षण दिले आहे.त्यानुसार महाराष्ट्र राज्य प्रत्येक वर्षी उघोग संचालनालय यांच्यामार्फत शासकीय कार्यालयांना लागणाऱ्या वेगवेगळ्या कापडांची दर निश्चिती करते. गेल्या सात-आठ वर्षापासून या प्रकल्पातील कामगारांना पुरेशा प्रमाणात काम मिळत नसल्याने प्रकल्प चालू-बंद अवस्थेत सुरु आहे. यंत्रमाग महामंडळाने या व्यवसायातील तज्ज्ञ अनुभवी अधिकारी यांची नियुक्ती केली असताना प्रकल्पाची कामे सुरळीत चालण्याऐवजी डबघाईला कसे काय आले, असा सवाल करत येथील कामगार या परिस्थिला जबाबदार कोण? असा जाब विचारु लागले आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करुन पाणी नेमकं कुठं मुरतंय
हे शोधून आम्हा कामगारांना
न्याय देण्याची माफक अपेक्षा
कामगार व्यक्त करु लागले आहेत. (वार्ताहर)

‘मलिदा’ लाटत असल्याचा आरोप
सर्व शासकिय व निमशासकिय कार्यालयांना लागणाऱ्या कापडाचे उत्पादन या प्रकल्पाकडुनच करुन घेत असे पण सध्या या प्रकल्पातुन पुरेशा प्रमाणात कापड निर्र्मीती कच्च्यामाला अभावी होताना दिसत नाही.त्यामुळे या प्रकल्पाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बाहेरील नामधारी संस्थाकडून कापड खरेदी विक्री व्यवहार दाखवून मलिदा लाटण्याचा आरोप कामगार करु लागले आहेत.
दोन्ही सोसायट्या तोट्यात
या यंत्रमाग प्रकल्पाला सुरुवातीपासूनच महामंडळाकडून कापड निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कधीही पुरेशा प्रमाणात व वेळेवर न दिल्यामुळे याचा परिणाम कापड निर्मितीवर होऊन या दोन्ही सोसायट्या तोट्यात गेल्या आहेत. वर्षानुवर्षे संचित तोटा वाढत गेल्यामुळे हा प्रकल्प सध्या अखेरच्या घटका मोजत आहे.

Web Title: Gamewadi looming factory buried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.