आविष्कार सोशल ॲण्ड एज्युकेशन फाउंडेशन इंडियाचा हा पुरस्कार सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जातो. शिक्षकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा विद्यार्थी आणि विद्यार्थी हितासाठीच असतो, हेच जीवनसूत्र मानून आतापर्यंत कार्य करत अनेक आदर्श विद्यार्थी घडवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे व्यक्तिमत्त्व, अशी समाजात ओळख असलेले संतोष शिंदे हे विद्यार्थी आणि पालक यांच्यात अतिशय लोकप्रिय आहेत. नगरपालिका प्रशासन, समाजातील दानशूर लोक आणि संस्था तसेच पालक यांच्या मदतीने आजपर्यंत त्यांनी नगरपालिका शाळेत अनेक उपक्रम राबवून शाळेच्या विकासात उल्लेखनीय कार्य केले आहे.
गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगरसेवक, केंद्रप्रमुख दीपक चिकणे, जिल्हा आविष्कार फाउंडेशनचे कार्याध्यक्ष उद्धव निकम, शिवाजीराव निकम, चंद्रकांत आखाडे, संजय ओंबळे यांनी कौतुक केले.